Posts

मिरची लागवड तंत्रज्ञान

Image
मिरची लागवड तंत्रज्ञान मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो. मिरचीच्या जाती : सुधारित जाती : महात्मा फुले कृषी विद्यापिठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्‍शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत. ह्या जाती उत्पादनास तसेच गुणवत्तेस चांगल्या आहेत. अग्निरेखा : ही जात दोंडाईचा आणि ज्वाला या दोन जातींच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे. याची झाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरिप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी ही जात आहे. हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा आहे. हिरव्या मिरचीचे हेक्‍टरी १०० ते १२० क्विंटल तर वाळलेल्या मिरचीचे २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. फुले ज्योती : फळे घोसात लागतात. प्रति...

कृषी मित्र ने आणलेला पॉवर वीडर हा १०० टक्के Made in India

कृषी मित्र ने आणलेला पॉवर वीडर हा १०० टक्के Made in India https://www.youtube.com/my_videos?o=U

फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या

Image
कोकणातील शेतकऱ्याना आता पॉवर विडर घेणे झाले सोपे  फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते, त्यासाठी कोकणातील शेतकरी खूप मेहनत घेत आहे पण याच मेहनतीला आधुनिकीकरणाची जोड मिळाली तर खऱ्या अर्थाने कोकणातील शेतकरी संपन्न होईल. यासाठी कृषीमित्र घेऊन आले आहे अतिशय उत्तम दर्जाचे पॉवर विडर ✅ शासनाची सबसिडी उपलब्ध:- कृषीमित्र च्या पॉवर विडर ला शासनाकडून सबसिडी उपलब्ध असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यानी या पॉवर विडर ला पहिली पसंती दाखवली आहे. ✅ बँके तर्फे अर्थसहाय्य:- कृषीमित्र च्या पॉवर विडर ला SBI कडून कर्ज उपलब्ध आहे त्याच बरोबर आता RDCC बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध आहे. इतर बँकेतर्फे सुद्धा अर्थसहाय्य आहे. ✅ कृषीमित्र योजना:- एवढं असून हि ज्या शेतकऱयांना बँके तर्फे कर्ज न घेता पॉवर विडर खरेदी करायचा आहे त्यांच्या साठी एक उत्तम योजना कृषीमित्र राबवत आहे, फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या आपल्याला जर वरील पैकी कोणत्याही योजनेची अधिक माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरा, आ...

सिंधुदुर्गमध्ये आंबा लागवडीचा प्रथमच ‘इस्त्रायली’ प्रयोग

Image
सिंधुदुर्गमध्ये आंबा लागवडीचा प्रथमच ‘इस्त्रायली’ प्रयोग कोकणात प्रथमच इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करीत घन पद्धतीने आंबा लागवड करण्याचा प्रयोग देवगड तालुक्यातील वाघोटनच्या कातळावर यशस्वीपणे करण्यात आला आहे. देवगड येथील प्रगतशील आंबा बागायतदार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जनार्दन तेली यांनी हा प्रयोग केला आहे. अवघ्या अर्ध्या एकरात तब्बल 300 केसर जातीच्या आंबा रोपांची लागवड करण्यात आली असून लागवड केल्यानंतर अवघ्या तिसऱया वर्षीपासून आपण उत्पादन घेण्यास निश्चितपणे सुरुवात करणार असल्याचा विश्वास तेली यांनी व्यक्त केला आहे. शेती तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या इस्त्रायल देशाचा आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी, शेतकऱयांनी दौरा केला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पिक घेण्यासाठी इस्त्रायल हा देश संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कोकणातूनही अनेक शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱयांनी इस्त्रायलला भेटी दिल्या. परंतु ते तंत्रज्ञान कोकणात आणण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणी केला नव्हता. मात्र देवगड-वाघोटन येथील ...

कोकणातील भात शेती आणि त्यावरील रोग व उपाय

Image
भात हे कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि हवामानातील बदल यांसारख्या कारणांनी या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे.  भात हे कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि हवामानातील बदल यांसारख्या कारणांनी या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी यापुढील काळात पिकाच्या व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष द्यावे लागेल. यामध्ये लागवडीनंतरचे खतव्यवस्थापन, आंतरमशागत, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन तसेच पिकावर येणा-या किडी व रोगांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो. पावसाळी हंगामात हवेत जास्त प्रमाणात असणारी आद्र्रता, भात खाचरात साचून राहणारे पाणी आणि अनियमित पडणारा पाऊस या बाबी भात पिकावरील कीडरोगास कारणीभूत ठरतात. तसेच सततचे ढगाळ हवामान, जोराचा पाऊस आणि ऊनपाऊस यासुद्धा महत्त्वाच्या बाबी आहेत. भातावर प्रामुख्याने निळे भुंगे, पाने गुंडाळणारी अळी व सुरळीतील अळी या किंडीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच करपा व कडा करपा या रोगांचासुद्धा प्रादुर्भाव आढळतो. निळे भुंगे भुंगे निमूळते नळीसारखे ला...

कोकणातील शेतकऱ्याना आता पॉवर विडर घेणे झाले सोपे

Image
कोकणातील शेतकऱ्याना आता पॉवर विडर घेणे झाले सोपे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी मध्ये कृषी मित्र – विश्वास शेतकऱ्याचा या नावाने शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम असे दालन सुरु झाले आहे. या मध्ये शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या औजारांची उपलब्धता भरपूर आहे. कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते, त्यासाठी कोकणातील शेतकरी खूप मेहनत घेत आहे पण याच मेहनतीला आधुनिकीकरणाची जोड मिळाली तर खऱ्या अर्थाने कोकणातील शेतकरी संपन्न होईल. यासाठी कृषीमित्र घेऊन आले आहे अतिशय उत्तम दर्जाचे पॉवर विडर. तसे पॉवर विडर हे काही कोकणाला नवीन नाही. पण अजून हि बरेच शेतकरी त्या पासून लांब आहेत कारण पॉवर विडर ची किंमत. पण यावर उपाय कृषीमित्र ने आणला आहे. कोकणातील शेतकऱ्यानी सुद्धा या पॉवर विडर ला आपली पसंती दाखवली आहे. भातशेती साठी हा पॉवर विडर उपयोगी आहेच पण बागायतदारांसाठी उत्तम वरदान ठरला आहे. भातशेतीसाठी चिखळणी करणे, मशागत करणे यासाठी याचा उपयोग होतो, त्याच प्रकारे भाजीपाला व बागायतदारांना सुद्धा सरी करणे, फवारणी करणे अश्या कामा करिता याचा उपयोग होतो तसेच विहिरीतून 25 ते 30 फुटांपर्यंत पाणी उपसा करण्यासाठी...

नारळ बागेत ठेवा स्वच्छता

Image
नारळ बागेत ठेवा स्वच्छता डॉ. पी. बी. सानप, डॉ. व्ही. व्ही. शिंदे पहिली दोन वर्षे नारळ रोपांना विणलेले झाप, झावळ्या, गवत, फांद्या यांची सावली करावी. बागेत स्वच्छता, इतर कामे करताना झाडाच्या बुंध्याला जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचनाद्वारे मोठ्या झाडांसाठी प्रतिझाड, प्रतिदिन ३० ते ३५ लिटर पाणी द्यावे. नवीन बागेचे व्यवस्थापन नवीन रोपांना आधार द्यावा. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडून वाऱ्याने हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या ४५ सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूस रोवून त्याला आडवी काठी बांधावी, नारळ रोप सैलसर बांधून ठेवावे. नवीन लागवड केलेल्या बागेची स्वच्छता करावी. नांग्या त्वरित भरून घ्याव्यात. बागेत मोकाट पाणी दिल्यास आळ्यात तणांचा प्रादुर्भाव होतो. तसेच पाण्याचा अपव्यय होतो, त्यामुळे ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. तण नियंत्रणासाठी रोपांच्या अळ्यात जैविक अथवा प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे.ज्यामुळे तणाचा कमी प्रादुर्भाव होतो. पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. पहिली दोन वर्षे रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विणलेले झाप, झावळ्...